डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरु

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं सुरुवात होईल. दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला त्या संबोधित करतील. त्यानंतर आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडला जाईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या शनिवारी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सोमवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभार प्रस्तावावर दोन्ही सभागृहात चर्चा होईल. त्यानंतर अर्थसंकल्पावर १३ फेब्रुवारीपर्यंत चर्चा होईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र १० मार्चपासून सुरू होईल. या अधिवेशनात १६ विधेयक मांडण्याचं सरकारचं नियोजन आहे. 

 

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रसरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. बैठकीला ३६ विविध पक्षांचे मिळून ५२ खासदार उपस्थित होते असं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर बातमीदारांना सांगितलं. अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज  सुरळीतपणे चालवण्याच्या दृष्टीने सहकार्याचं आवाहन यावेळी सरकारतर्फे करण्यात आलं. 

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा, तसंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश, गौरव गोगोई, तृणमूलचे सुदीप बंदोपाध्याय, समाजवादी पार्टीचे रामगोपाल यादव, बिजू जनता दलाचे सस्मित पात्रा आणि द्रमुकचे टी आर बालू यांच्यासह विविध पक्षांचे खासदार त्यात सहभागी झाले होते. 

 

या अधिवेशनात बेरोजगारी, महागाई हे मुद्दे उपस्थित करणार असल्याचं काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी म्हणाले. प्रयागराजमध्ये झालेल्या दुर्घटनेवरही त्यांनी काळजी व्यक्त केली. वक्फ सुधारणा विधेयकावर संयुक्त संसदीय समितीचा अहवाल घाईघाईत मंजूर झाल्याचा आरोप त्यांनी केला. हा अहवाल समितीचा नसून पक्षाला असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे खासदार राम गोपाल यादव यांनी केला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा