डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

January 30, 2025 8:32 PM

printer

अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज सुरळीतपणे चालवण्याच्या दृष्टीने सहकार्य करण्याचं सरकारचं आवाहन

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रसरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा, संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू, तसंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश, गौरव गोगोई, तृणमूलचे सुदीप बंदोपाध्याय, समाजवादी पार्टीचे रामगोपाल यादव, बिजू जनता दलाचे सस्मित पात्रा आणि द्रमुकचे टी आर बालू यांच्यासह विविध पक्षांचे खासदार त्यात सहभागी झाले होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज  सुरळीतपणे चालवण्याच्या दृष्टीने सहकार्याचं आवाहन यावेळी सरकारतर्फे करण्यात आलं. 

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं उद्या अधिवेशनाची सुरुवात होईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या शनिवारी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सोमवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभार प्रस्तावावर दोन्ही सभागृहात चर्चा होईल.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा