नागरिकांच्या वैयक्तिक माहितीचं संरक्षण करणं हा डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण कायद्याच्या मसुद्याचा उद्देश आहे. असं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. नागरिकांच्या डिजिटल स्वरुपातल्या वैयक्तिक तपशीलांची गोपनीयता कायम राखण्यासाठी कायद्याची चौकट मजबूत करण्याच्या हेतूने ही नियमावली तयार करण्यात आली आहे. सर्व घटकातल्या भागधारकांच्या गरजा आणि जगभरातल्या सर्वोत्तम पद्धतींचा अभ्यास करून हा मसुदा तयार करण्यात आला आहे. या मसुद्याला कायद्याचं स्वरूप देण्यापूर्वी नागरिकांनी या नियमावलीच्या मसुद्याविषयीचे आपले अभिप्राय आणि सूचना MyGov पोर्टलवर १८ फेब्रुवारीपर्यंत सादर कराव्यात, असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे.
Site Admin | January 5, 2025 1:30 PM | Data Protection Rules