डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 12, 2024 3:25 PM

printer

राज्यातली प्रमुख धरणं ९० ते ९५ टक्के भरली

राज्यातली प्रमुख धरणं सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच ९० ते ९५ टक्के भरली आहेत. मराठवाड्यात जायकवाडी धरण ९८ टक्के, सोलापुरात उजनी धरण १०० टक्के आणि साताऱ्यातलं कोयना धरण ९९ टक्के भरलं आहे. पुणे आणि कोकणातली ९७ टक्के धरणं पूर्ण भरली असून, मुंबई तसंच ठाणे जिल्ह्यातली धरणंही ९५ ते १०० टक्के नागपूर विभागातली धरणं ८५ टक्के भरली आहेत. अमरावतीतील ऊर्ध्व वर्धा धरण ९५ टक्के तर यवतमाळमधील इसापूर धरण ९८ टक्के भरलं आहे. गोसीखुर्द धरण केवळ ५५ टक्के उत्तर महाराष्ट्रातील जळगावमधील उर्ध्व तापी धरण ४५ टक्के भरलं आहे. ऑक्टोबरपर्यंत उर्वरित धरणंही भरतील, असा अंदाज आहे. यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामात जास्त उत्पादनाची अपेक्षा आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा