रत्नागिरी जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे कापणीला आलेल्या भात आणि नाचणी पिकांचं नुकसान झालं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. राजापूर तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून लांजा, संगमेश्वर, रत्नागिरी, खेड, चिपळुण, गुहागर आणि दापोलीतही जोरदार पाूस सुरू आहे. या पावसामुळे ग्रामीण भागासोबत शहरी भागातही जनजीवन विस्कळीत झालं आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले चार दिवस सुरू असलेल्या अवकाळी पावसाच्या संततधारेमुळे कापणीला आलेल्या पिकांचं नुकसान झालं असून सुमारे ५० हजार हेक्टरवरचं पीक धोक्यात आलं आहे. पाऊस कायम राहिल्यास भाताची पिकं कुजून शेतकऱ्याचं नुकसान होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, वाशिम जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांचा विश्रांतीनंतर मालेगाव आणि मानोरा तालुक्यातल्या काही गावात जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे सोयाबीन काढणीच्या हंगामात शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत.