राज्यात विविध जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे अनेक धरणं भरली आहेत.
नाशिक जिल्ह्यात काल रात्रीपासून जोरदार पाऊस झाला. त्यामुळे गोदावरी नदीची पाण्याची पातळी वाढली आहे. सातारा जिल्ह्यात संततधार पावसामुळे कोयना धरणातला पाणीसाठी १०२ पूर्णांक ४३ दशांश टीएमसी इतका झाला आहे. त्यामुळे आज धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडून कोयना नदीत पाणी सोडण्यात आलं. तसंच धोम धरणातून कृष्णा नदीत आणि वीर धरणातून नीरा नदीत पाणी सोडण्यात आलं. त्यामुळे कोयना, कृष्णा, नीरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धाराशिव जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं तेरणा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आहे.