चक्री वादळ फेंजलने काल रात्री तामिळनाडू आणि पुद्दुचेरी किनारपट्टीवर कराईकल आणि महाबलीपुरम दरम्यान धडक दिली. ताशी 90 किलोमीटरपर्यंत वाऱ्यांसह तामिळनाडू आणि शेजारच्या पुद्दुचेरीमध्ये २० सेंटीमीटर्सपर्यंत पाऊस पडला. वीज अंगावर पडून काल तीन जणांचा मृत्यू झाला. पावसामुळं बस, रेल्वे आणि विमान सेवांसह सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम झाला. ही वाहतूक आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. असुरक्षित भागातील लोकांना अधिकाऱ्यांनी सुरक्षित आश्रयस्थानांमध्ये हलवलं आहे. भारतीय हवामान विभागानं तामिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेश, केरळ आणि अंतर्गत कर्नाटकातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर लाल बावटा जारी केला आहे
Site Admin | December 1, 2024 2:56 PM | Cyclone Fengal | pudduchery
फेंजल चक्रीवादळाचा तमिळनाडु आणि पुदुच्चेरीला तडाखा
