फेंगल चक्रीवादळाने बाधित तामिळनाडूसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने ९४४ कोटी रुपयांचं अर्थसाहाय्य घोषित केलं आहे. तामिळनाडू आणि पुदुच्चेरीमधल्या चक्रीवादळाने प्रभावित भागाची पाहणी करण्यासाठी केंद्रातर्फे मंत्र्यांचं एक पथक पाठवलं असल्याचंही गृहमंत्रालयाने सांगितलं आहे. राज्यांमधल्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी केंद्र सरकार नेहमीच राज्य सरकारांच्या पाठीशी उभं राहत असून यावर्षात आतापर्यंत केंद्र सरकारने विविध राज्यांना आपत्ती निवारणासाठी २१ हजार ७१८ कोटी रुपयांची मदत दिली आहे, असं गृहमंत्रालयाने म्हटलं आहे.
Site Admin | December 6, 2024 8:07 PM | Cyclone Fengal | Tamil Nadu