डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सरकार सायबर प्रयोगशाळांचं जाळं मजबूत करत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सरकार सायबर प्रयोगशाळांचं जाळं अधिकाधिक मजबूत करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुंबईत डी बी मार्ग पोलीस ठाण्यात सायबर प्रयोगशाळेचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केलं, त्यावेळी ते बोलत होते. वरळी पोलीस ठाणे आणि गोवंडी पोलीस ठाण्यातल्या प्रयोगशाळांचं मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन उद्घाटन केलं. यासह मुंबई पोलिसांच्या इतर उपक्रमांचंही उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केलं.  त्यात मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन, अत्याधुनिक दुचाकी यांचा समावेश आहे. 

 

या प्रयोगशाळांमध्ये जगातलं अद्ययावत तंत्रज्ञान उपयोगात आणलं जाणार आहे. ऑनलाईन पद्धतीने पैशांची हेराफेरी करणं, बँक खातं हॅक करणं अशा पद्धतीच्या गुन्ह्यांवर प्रयोगशाळेच्या माध्यमातून नियंत्रण मिळविण्यात येणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा