महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र सायबर गुन्हे सुरक्षा महामंडळाची रूपरेषा जारी केली आहे. हे महामंडळ स्थापन केल्याने नगरिकांचं तसंच खाजगी क्षेत्रातील कंपन्यांचं सायबर गुन्ह्यापासून आणि संबंधित धोक्यांपासून संरक्षण होईल असा दावा राज्य सरकारने केला आहे.
यापूर्वी सायबर गुन्हे विभाग राज्य पोलिसांच्या अधीन होता. यासाठी महामंडळ स्थापन करण्याला गेल्या महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.