सीमाशुल्क विभागानं मुंबई विमानतळावर गेल्या तीन दिवसात अकरा जणांकडून एकूण दहा किलोहून अधिक सोने जप्त केलं. या सोन्याची एकूण किंमत ६ कोटी ७१ लाख एवढी आहे. मेणाच्या वस्तू, दागिन्यांचे साचे तसंच अंगावरुन अशा विविध मार्गाने या सोन्याची तस्करी होत होती.
१४ ते १६ जून या कालावधीत शारजा ते मुंबई, मुंबई ते काठमांडू, दुबई, अदिसअबाबा अशा अनेक ठिकाणांहून प्रवास करणाऱ्यांकडून या सोन्याची गैरमार्गाने वाहतूक केली जात होती.