अमेरिकेने जाहीर केलेल्या आयात शुल्काला ९० दिवसांकरता स्थगिती दिल्यानंतर युरोपीय संघानंही प्रत्युत्तरात जाहीर केलेली आयात शुल्कवाढ थांबवली आहे. युरोपीयन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देल लेयेन यांनी काल समाजमाध्यमावर हा निर्णय जाहीर केला.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी युरोपीय देशांमधून येणाऱ्या मालावर २५ टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर युरोपीय संघटनेनं प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला. नवीन टॅरिफ दर १५ एप्रिलनंतर लागू झाले असते. ते सध्या स्थगित करण्यात आले आहेत.
दरम्यान या टॅरिफ युद्धाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटीश प्रधानमंत्री केर स्टार्मर आणि जपानचे प्रधानमंत्री शिगेरु इशिबा यांची काल चर्चा झाली. टॅरिफ युद्धाने कोणालाच फायदा होत नाही यावर त्यांच्यात सहमती झाली.