बांगलादेशातून होणाऱ्या संभाव्य बेकायदेशीर स्थलांतराच्या पार्श्वभूमीवर मणिपूर राज्य सरकारने फेरजॉल आणि जिरिबाम जिल्ह्यात रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू केली आहे. दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश जारी केले.
बंदुक, तलवार, काठी, दगड किवा कुठलंही धारदार शस्त्र बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. जिरिबाम जिल्ह्यात जिरिबाम नगरपरिषद आणि बोरोबेका उप विभागाच्या हद्दीत सकाळी ९ ते दुपारी तीन या वेळेत या नियमांमध्ये सूट देण्यात आली आहे.