CUET-UG सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षेचा निकाल राष्ट्रीय चाचणी संस्थेनं जाहीर केला आहे. उमेदवारांचे निकाल संबंधित विद्यापीठांना देण्याची प्रक्रिया सुरु आहे. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी आपल्या शिक्षणसंस्था आणि विद्यापीठांशी संपर्कात रहावं, असा सल्ला राष्ट्रीय चाचणी संस्थेनं दिला आहे. १५ ते २९ मे दरम्यान देशभरातल्या २६ शहरांमधे झालेल्या या परीक्षेला १४ लाख ९९ हजाराहून जास्त विद्यार्थी बसले होते.
Site Admin | July 28, 2024 8:52 PM | CUET-UG | परीक्षा निकाल