मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी सुमारे १ किलो आठशे ग्रॅम कोकेन जप्त केलं आहे. कोकेनची किंंमत सुमारे १७ कोटी नव्वद लाख रुपये आहे.
याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्या बॅगेच्या झडती दरम्यान अधिकाऱ्यांना कोकेन सापडलं. हा आरोपी १ एप्रिल रोजी नैरोबीहून मुंबईला आला होता.