क्रूझ भारत अभियानाद्वारे येत्या पाच वर्षांत जहाजावरून पर्यटन करणाऱ्यांची संख्या दुप्पट करण्याचं ध्येय असल्याची माहिती केंद्रीय बंदरं, वाहतूक आणि पर्यटन मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी दिली आहे. मुंबई इथं एम्प्रेस जहाजावर आज क्रूझ भारत अभियानाचा प्रारंभ सोनोवाल यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. हा भारतातल्या समुद्री पर्यटन क्षेत्राचं पुनरुज्जीवन करण्याच्या प्रक्रियेतला मैलाचा दगड आहे, असं प्रतिपादन त्यांनी केलं. भारताच्या जलपर्यटन क्षेत्राकडे मोठ्या काळापासून दुर्लक्ष झालं असून या अभियानामुळे भारताच्या समुद्रीक्षेत्रात परिवर्तन येईल आणि देशाचा विस्तृत किनारा आणि जलमार्गांच्या क्षमतेचा योग्य उपयोग जलपर्यटनाद्वारे करता येईल, अशी ग्वाही सोनोवाल यांनी दिली. या अभियानाद्वारे जहाजात चढणं-उतरणं, तसंच जहाजांवरून विविध ठिकाणांना भेटी देण्यासाठी उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. १ ऑक्टोबर २०२४ ते ३१ मार्च २०२९ या कालावधीत तीन टप्प्यांमध्ये हे अभियान राबवलं जाईल.
Site Admin | September 30, 2024 9:06 PM | cruise bharat mission | Sarbananda Sonowal | क्रूझ भारत अभियान | सर्वानंद सोनोवाल