अबूधाबीचे युवराज शेख खालेद बिन मोहमद बिन झायेद अल नाहयान यांचं तीन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आज संध्याकाळी नवी दिल्लीत आगमन झालं. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. युवराज नाहयान यांच्यासोबत संयुक्त अरब अमिरातीचे अनेक मंत्री आणि उद्योगजगतातलं प्रतिनिधीमंडळ आहे. युवराज नाहयान उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून द्विपक्षीय संबंधांवर ते चर्चा करतील. तसंच ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची ते भेट घेतील आणि राजघाट इथं जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहतील. मंगळवारी युवराज नाहयान मुंबईत एका व्यापार मंचाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
Site Admin | September 8, 2024 8:01 PM | Abu Dhabi | India
अबुधाबीचे युवराज अल नाहयान यांची उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी बैठक
