कृषी विभागाच्या ताज्या अहवालानुसार राज्यातील दहा जिल्हयांत पावसामुळे पिकांचं नुकसान झालं आहे. यामध्ये खरिपातील सुमारे आठ लाख 48 हेक्टर क्षेत्रावरील पिकं बाधित झाली असून, नुकसानाचे पंचनामे सुरू असल्याची माहिती राज्याचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली. कृषी विभागाच्या 24ऑगस्टपासून आतापर्यंतच्या अहवालानुसार खरीप हंगामातील पिकांमध्ये कापूस, सोयाबीन, तूर, बाजरी, मूग, उडीद, मका, ज्वारी पिकांचं आणि कांदा, भाजीपाल्याचंही नुकसान झालं आहे. अतिपावसामुळं पिकांचं नुकसान झालं असेल तर शेतक-यांनी पीक विमा कपंनीला कळवलं पाहिजे, जेणेकरून पंचनामे करण्याच्या कामासही गती येईल, असंही आवटे म्हणाले.
Site Admin | September 8, 2024 11:59 AM | Maharashtra