महिला आशिया चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरुद्ध होत आहे. श्रीलंकेमध्ये दाम्बुला इथं रनगिरी दाम्बुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना होत आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, आज दुपारी झालेल्या स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात नेपाळने संयुक्त अरब अमिरातीच्या संघावर ६ गडी राखून विजय मिळवला आहे.