भारतीय महिला क्रिकेट संघानं वेस्ट इंडिजविरुद्धची एकदिवसीय मालिका ३-० अशी जिंकली. वडोदरा इथं आज झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजवर पाच गडी राखून विजय मिळवला. वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ३८ षटकात सर्वबाद १६२ धावा केल्या. भारतानं अवघ्या २८ षटकांत १६७ धावा करत विजयी लक्ष्य पार केलं.
भारताच्या विजयात दिप्ती शर्माच्या भेदक गोलंदाजीचा मोठा वाटा आहे. दिप्तीनं ३१ धावांच्या बदल्यात सहा गडी बाद केले. तिला प्लेअर ऑफद मॅच तर रेणुका सिंह ठाकूर हिला प्लेअर ऑफ द सिरीजनं सन्मानित करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात सहा गडी बाद करणारी दिप्ती शर्मा पहिली भारतीय महिला गोलंदाज ठरली.दिप्तीच्या आधी दक्षिण आफ्रिकेच्या सुन लुस हिनं सहा गडी बाद केले होते.