आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा सामना आज गुजरात टायटन्सशी होणार आहे. हा सामना बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल.
काल रात्री लखनौ इथं झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सनं लखनौ सुपर जायंट्स संघाचा ८ गडी राखून पराभव केला. लखनौ सुपर जायंट्स संघानं निर्धारित २० शतकात ७ गडी गमावून १७१ धावा केल्या.
पंजाब किंग्सनं अवघ्या २ गड्यांच्या मोबदल्यात १६ षटकं आणि २ चेंडुंत हे आव्हान पार केलं. गुणतालिकेत पंजाब किंग्ज चार गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे, तर लखनौ दोन गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.