आयपीएल टीट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद संघाचा सामना लखनऊ सुपर जायंट्स संघाबरोबर होणार आहे. हैदराबाद इथे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये आज संध्याकाळी साडेसात वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
काल झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने राजस्थान रॉयल्स संघाचा ८ गडी राखून पराभव केला. राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करत कोलकाता संघाला १५२ धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान कोलकाता संघाने २ गड्यांच्या मोबदल्यात १७ षटकं आणि ३ चेंडूंत पूर्ण केलं. कोलकाता नाईट रायडर्ससडून क्विंटन डीकॉक याने नाबाद ९७ धावांची खेळी केली.