कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या डावात न्यूझिलंडने आज दिवसअखेर ५ गड्यांच्या मोबदल्यात १९८ धावा केल्या. यासह न्यूझिलंडने सामन्यात ३०१ धावांची आघाडी घेतली आहे. वॉशिंग्टन सुंदरने चार तर आर. अश्विन याने एक गडी बाद केला.
त्याआधी भारताचा पहिला डाव १५६ धावांवर आटोपला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांपुढे भारतीय फलंदाजी ढेपाळली. विराट कोहली, रोहित शर्मा, रिषभ पंत हे खेळाडू फारशी चमक न दाखवताच तंबूत परतले. यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांनी प्रत्येकी ३० धावा केल्या. तर रवींद्र जडेजा यानं ३८ धावा केल्या. न्यूझीलंडकडून सतनेर याने सर्वाधिक ७ गडी बाद केले. काल सामन्याच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडने भारतासमोर २५९ धावांचं आव्हान ठेवलं होतं.