डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

ICC Champions Trophy: भारतीय क्रिकेट संघ दुबईला रवाना

आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी रोहित शर्माच्या नेतृत्वातला भारतीय क्रिकेट संघ आज दुबईला रवाना झाला.

या स्पर्धेत भारताचा समावेश अ गटात असून, २० फेब्रुवारीला भारताचा सलामीचा सामना बांगलादेश विरोधात होणार आहे. त्यानंतर २३ फेब्रुवारीला पाकिस्तानविरुद्ध आणि २ मार्चला न्यूझीलंडविरोधात भारताची लढत होणार आहे.

स्पर्धेच्या विजेतेपदासाठी अंतिम लढत ९ मार्चला होणार आहे. 

भारतानं याआधी दोन वेळा या स्पर्धेचं विजेतपद आणि दोन वेळा उपविजेतेपद पटकावलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा