महिला प्रीमिअर लीग टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्सचा सामना दिल्ली कॅपिटल्स विरोधात होणार आहे. आज संध्याकाळी साडेसात वाजता वडोदरा इथं हा सामना सुरू होईल.दरम्यान काल झालेल्या स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं गुजरात जायंट्सचा ६ खेळाडू आणि ९ चेंडू राखून पराभव केला.
विजयासाठी गुजरातनं दिलेलं २०२ धावांचं आव्हान रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं केवळ ४ खेळाडूंच्या मोबदल्यात पार केलं.या सामन्यात गुजरातच्या वतीनं ॲश्ले गार्डनर हीनं सर्वाधिक ७९, तर बंगळुरुच्या वतीनं ऋचा घोष हीनं सर्वाधिक ६४ धावा केल्या.