भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना काल भारताने ४ गडी राखून जिंकला. यासह भारताने मालिकाही जिंकली आहे. इंग्लंडचं ३०५ धावांचं आव्हान भारतानं ४४ षटकं आणि ३ चेंडूत पार केलं.
कर्णधार रोहित शर्मानं शतकी खेळी करत भारतीय संघाचा विजय सोपा केला. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या गड्यासाठी १३६ धावांची भागीदारी केली. शुभमन गिल ६० धावा काढून बाद झाला. श्रेयस अय्यरनं ४४ आणि अक्सर पटेलनं नाबाद ४१ धावा केल्या.
त्याआधी इंग्लंडचा डाव सामन्यातला केवळ एक चेंडू शिल्लक असताना संपुष्टात आला. फिल्सोल्ट आणि बेेन डकेट यांनी पहिल्या गड्यासाठी ८१ धावांची भागीदारी केली. ज्यो रुटनं ६९, तर बेेन डकेटनं ६५, धावा केल्या. लियाम लिविंगस्टोननं ४१, तर हॅरी ग्रोथनं ३१ धावांचं योगदान दिलं. भारतातर्फे रविंद्र जडेजानं ३ गडी बाद केले.
रोहित शर्माला सामनावीर घोषित करण्यात आलं. या मालिकेतला अंतिम सामना येत्या बुधवारी अहमदाबाद इथं खेळला जाणार आहे.