विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकांची निवड गुणवत्तेवर करण्यासाठी पारदर्शक यंत्रणा निर्माण करण्याची गरज राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केली. मुंबई विद्यापीठाच्या वार्षिक दीक्षांत समारंभात ते आज बोलत होते. यावेळी १ लाख ६४ हजार ४६५ विद्यार्थ्यांना पदवी तर ४०१ विद्यार्थ्यांना पीएच.डी. आणि १८ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली. शिक्षण ही निरंतर प्रक्रिया असून ती आयुष्यभर सुरु असली पाहिजे असं सांगताना विद्यार्थ्यांनी इतरांशी तुलना न करता आपल्या गतीनं शिकावं असं राज्यपाल म्हणाले. सर्व विद्यापीठांनी वर्षाच्या सुरुवातीलाच वर्षभराचं शैक्षणिक वेळापत्रक तयार करुन ते विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावं आणि त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी तसचं जून महिन्यापर्यंत निकाल जाहीर करून एका महिन्यात दीक्षांत समारोह आयोजित करावेत जेणेकरून विद्यार्थ्यांना लगेच पदवी मिळेल असं त्यांनी सांगितलं. यावेळी अनेक मान्यवर, अधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
Site Admin | January 7, 2025 7:22 PM | CP Radhakrishnan