देशाची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत असून शेअर बाजार पूर्णपणे मजबूत असल्याचं भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. गुंतवणूकदारांना हिंडेनबर्ग आणि काँग्रेसचं कारस्थान लक्षात आलं असल्याने शेअर बाजारावर त्याचा परिणाम झालेला नाही, असा दावा त्यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषदेत केला. अशा अफवांच्या माध्यमातून देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.
Site Admin | August 12, 2024 3:20 PM | Ravi Shankar Prasad
गुंतवणूकदारांना हिंडेनबर्ग आणि काँग्रेसचं कारस्थान लक्षात आलं असल्याने शेअर बाजारावर त्याचा परिणाम झाला नाही, असा भाजपाचा दावा
