भारत गेल्या वर्षी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चांद्रमोहीम राबवणारा चौथा देश आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या परिसरात पोहोचलेला जगातला पहिलाच देश ठरला. या यशाच्या सन्मानार्थ दरवर्षी २३ ऑगस्ट हा दिवस अंतराळ दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
मोहिमे संदर्भात विविध शाखांमधल्या लोकांसाठी अमर्याद संधी या विषयीचे उपक्रम होणार आहेत. इस्रोचे शास्त्रज्ञ आणि बेंगळुरुच्या यू आर राव उपग्रह केंद्राचे संचालक एम संकरन यांनी आकाशवाणीला या उपक्रमांची विस्तृत माहिती दिली.