यंदा देशात खरीप पिकांच्या पेरणी क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. १० कोटी ८७ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर आतापर्यंत पेरणी झाली असल्याचं कृषी आणि शेतकरी कल्याण विभागानं आज प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे. गेल्यावर्षी पेक्षा यंदा २१ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली आहे.
४ कोटी ८ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर भात, तर १ कोटी २५ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर कडधान्यांची लागवड झाली आहे. तृणधान्यांखालच्या क्षेत्रानं यंदा १ कोटी ८७ लाख हेक्टरचा टप्पा ओलांडला असून, गळीताचं क्षेत्रं १ कोटी ९० लाख हेक्टरच्या वर गेलं आहे. यंदा आतापर्यंत ५७ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर ऊसाची लागवड झाली आहे.