डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

December 12, 2024 7:04 PM | Country Desk

printer

गुंतवणूकदारांचे प्रस्ताव आणि सल्ला तसंच मदतीसाठी राज्य सरकार ‘कंट्री डेस्क’ कक्ष स्थापन करणार

देशविदेशातल्या गुंतवणूकदारांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी या उद्देशाने राज्य शासनानं विविध उपक्रम सुरू केले आहेत. या उपक्रमांचा एक भाग म्हणून गुंतवणूकदारांचे प्रस्ताव आणि सल्ला तसंच मदतीसाठी कंट्री डेस्क हा विशेष कक्ष स्थापन केला जाणार आहे. त्याचबरोबर नवीन गुंतवणुकीसाठी जागतिक आणि प्रादेशिक व्यापारासोबत सुसंगत धोरण तयार करण्यावर भर दिला जाणार आहे. तसंच, आजपर्यंत सामंजस्य करारांची अंमलबजावणी जलद गतीने करण्यात येईल. तसंच, दूतावास आणि व्यापार संघटनांशी समन्वय वाढवणे, इलेक्ट्रॉनिक्स, कापड, ऑटोमोबाईल आणि औषधनिर्मिती अशा विविध क्षेत्रांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा