डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

सात राज्यांमधल्या तेरा विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी सुरू

सात राज्यांमधल्या तेरा विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी आज सुरू आहे. १० जुलै रोजी या निवडणुकीसाठी मतदान झालं होतं. पंजाबमधल्या जालंधर पश्चिम मतदारसंघाचा निकाल घोषित झाला असून इथं आम आदमी पार्टीचे मोहिंदर भगत हे विजयी झाले आहेत. तर हिमाचल प्रदेशमधल्या देहरा मतदारसंघात काँग्रेसचे कमलेश ठाकुर जिंकले आहेत. इतर मतदारसंघांचे कल स्पष्ट झाले असून पश्चिम बंगालमधल्या रायगंज, राणाघाट दक्षिण, बागडा आणि मणिकताल या चारही मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. उत्तराखंडमधल्या मंगलौर आणि बद्रीनाथ तसंच मध्य प्रदेशच्या अमरवाडामध्ये काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. तमिळनाडूमधल्या विक्रवंडी मध्ये द्रमुक, बिहारच्या रुपौली मतदारसंघात अपक्ष उमेदवार शंकर सिंह आघाडीवर आहेत. तर हिमाचलप्रदेशच्या नलगढ मध्ये काँग्रेस आणि हमीरपूरमध्ये भाजपाचा उमेदवार आघाडीवर आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा