भारतीय कापूस महामंडळानं कापूस उत्पादक 12 राज्यातल्या 149 जिल्ह्यांमध्ये मिळून 499 खरेदी केंद्रं स्थापन केल्याची माहिती केंद्र सरकारनं काल राज्यसभेत दिली. या केंद्रांमध्ये कोणत्याही दर्जात्मक निर्बंधांशिवाय शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत किमतीनं कापूस खरेदी केली जाणार आहे. वस्त्रोद्योग राज्यमंत्री पवित्रा मार्गरिटा यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिली.
दरम्यान, हातमाग क्षेत्राच्या विकासासाठी आणि हातमाग विणकरांच्या कल्याणासाठी सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करत असून त्यासाठी वस्त्रोद्योग मंत्रालय राष्ट्रीय हातमाग विकास कार्यक्रम आणि कच्चा माल मदत योजना राबवत आहे असं पवित्रा यांनी सांगितलं.