देशात आर्थिक क्षेत्रात सायबरसज्जता वाढवण्यासाठी भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथक म्हणजे सीईआरटी आणि मास्टरकार्ड इंडिया यांच्यात सहकार्य करार करण्यात आला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयानं याबाबत माहिती दिली. या दोन्ही संस्था सायबरसुरक्षिततेबाबत प्रतिसाद देण्यासाठीची यंत्रणा सक्षम करण्यासाठी एकत्र काम करतील. त्यासाठी देशभरात प्रशिक्षण कार्यक्रम आणि कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत.
Site Admin | June 20, 2024 12:26 PM | माहिती-तंत्रज्ञान मंत्रालय | सायबर | सीईआरटी आणि मास्टरकार्ड इंडिया