नाशिक इथल्या महाराष्ट्र पोलीस अकादमीचा १२५ वा दीक्षांत सोहळा आज पार पडला. या सोहळ्यानंतर १०८ पुरुष आणि ३ महिला असे एकूण १११ पोलीस उपनिरीक्षक आपलं प्रशिक्षण पूर्ण करून पोलीस पथकात दाखल झाले. राज्याचे दहशतवादविरोधी पथकाचे अपर पोलिस महासंचालक नवल बजाज हे या सोहळ्याला उपस्थित होते.
यावेळी प्रशिक्षीत पोलीस उपनिरीक्षकांच्या तुकडीनं शानदार संचलनानं बजाज यांना मानवंदना दिली, तर अकादमीचे संचालक राजेश कुमार यांनी प्रशिक्षीत पोलिस उपनिरीक्षकांना सेवेची शपथ दिली. या सोहळ्यात गोंदिया पोलिस दलात कार्यरत असलेल्या चेतनलाल पटले यांना अष्टपैलू कामगिरीसाठी मानाची रिव्हॉल्व्हर, तसंच सिल्व्हर बॅटन देऊन गौरवण्यात आलं. यावेळी उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या प्रशिक्षीतांना बाबासाहेब आंबेडकर चषक, यशवंतराव चव्हाण सुवर्ण चषक, बेस्ट कॅडेट इन स्टडीची पारितोषिकंही प्रदान केली गेली.