नाशिक रोड इथल्या कॅट अर्थात कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमधले विविध अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा दीक्षान्त समारंभ आज सकाळी झाला. या प्रसंगी शानदार संचलन करत वैमानिकांच्या तुकडीनं वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना मानवंदना दिली. चित्ता, चेतक, ध्रुव या लष्करी हेलिकॉप्टरची चित्तथरारक प्रात्यक्षिकं यावेळी झाली.
कॅटच्या या दीक्षांत समारंभादरम्यान नेपाळ, नायजेरिया तसंच भारतीय लष्करी अधिकाऱ्यांसह ४ महिला अधिकाऱ्यांनीही हेलिकॉप्टर पायलटची पदवी प्राप्त केली.