भारतीय रेल्वेनं हायस्पीड रेल्वेच्या निर्मीती आणि उत्पादनाचं काम सुरू केलं असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. इंटिग्रल कोच फॅक्टरीच्या सहकार्यानं हाय स्पीड रेल्वेची रचना तयार करत असल्याचं त्यांनी सांगितलं. याचा उत्पादन खर्च प्रति डब्बा सुमारे २८ कोटी रुपये आहे. दुसऱ्या एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचा वेग कमी करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही.
Site Admin | November 27, 2024 6:25 PM | Ashwini Vaishnav | Indian Railway