थायलंडच्या संविधानिक न्यायालयानं प्रधानमंत्री स्रेथा थविसिन यांना पदच्युत केले आहे. १६ वर्ष कैदेत असलेल्या माजी वकीलाची मंत्रीमंडळात नियुक्ती करुन नैतिक मूल्यांचं उल्लंघन केल्याचा आरोप न्यायालयानं ठेवला आहे. ५ विरुद्ध ४ अशा बहुमतानं न्यायाधीशांनी हा निर्णय घेतला. ४० सिनेटरनं न्यायालयानं प्रधानमंत्र्यांच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं. थविसिन गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये निवडून आले होते. संसदेकडून नव्या प्रधानमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत उपप्रधानमंत्री फेमुथन वेचायोचाई काळजीवाहू प्रधानमंत्री पदाचा पदभार सांभाळणार आहेत.