डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

December 15, 2024 9:32 AM | Prime Minister Modi

printer

आपल्या कार्यकाळातल्या घटना दुरुस्त्या समाजातल्या वंचिताच्या हितासाठी – पंतप्रधान

आपल्या कार्यकाळातल्या घटना दुरुस्त्या समाजातल्या वंचिताच्या हितासाठी केल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राज्यघटना स्वीकृतीच्या अमृत महोत्सवानिमित्त लोकसभेत संविधानावर झालेल्या विशेष चर्चेच्या उत्तरात ते काल बोलत होते. काँग्रेसने संविधानाचा सातत्याने अवमान केला, तसंच राजकीय स्वार्थासाठी संविधानाचा वापर केल्याचं नमूद करत, काँग्रेसच्या कार्यकाळात ६५ वेळा घटना दुरुस्ती करण्यात आल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. आणिबाणीसह अनेक घटनांचा त्यांनी यावेळेस उल्लेख केला. आपल्या कार्यकाळात मात्र इतर मागास वर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा, गरीब घटकांना दहा टक्के आरक्षण, महिला आरक्षण, काश्मीरातून कलम ३७० हटवणं यासह समाजाच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी घटनादुरुस्ती केल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं.

 

ते म्हणाले. “हमने भी संविधान संशोधन किए है देश की एकता के लिए देश के उज्वल भविष्य के लिए आज संविधान की भावना के प्रति पूर्ण समर्पण के साथ किए है हमने जो संविधान संशोधन किए है वह पुराणी गलतियों को ठीक करने के लिए किए है और हमने एक उज्वल भविष्य का रास्ता मजबूत करने के लिए किए है और समय की कसौटी पर हम खरे उतरेंगे क्यूंकि सबके स्वास्थ के लिए किया गया पाप नहीं है देश हित में किया गया पुण्य है” कर्तव्य पालन, सबका साथ सबका विकास, भ्रष्टाचाराचं संपूर्ण निर्मूलन, कायदे परंपरांचं पालन, आदी ११ संकल्प पंतप्रधानांनी यावेळी सदनासमोर मांडून आपल्या भाषणाचा समारोप केला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा