डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

जागतिक पातळीवर हळदीला असलेली मागणी लक्षात घेऊन राज्यातल्या शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहीत करावं – मुख्यमंत्री 

जागतिक पातळीवर हळदीला असलेली मागणी लक्षात घेऊन राज्यातल्या शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहीत करावं असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई इथं दिले. ते सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या हळद संशोधन केंद्राबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होते.

 

हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत इथे आगामी ३ वर्षात सुरु होणार असलेल्या देशातल्या पहिल्या हळद संशोधन केंद्रामुळे मराठवाडा आणि विदर्भासारख्या दुष्काळग्रस्त भागात सुवर्णक्रांती होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. या केंद्रासाठी ८०० कोटी रुपयांचा निधी आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. या संशोधन केंद्रात उती संवंर्धीत रोपांची प्रयोगशाळा, हळद प्रक्रीया केंद्र तसंच विकीरण केंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून स्थानिक शेतकऱ्यांनी पिकवलेली हळद निर्यातही केली जाणार आहे. वसमत हळदीला जीआय मानांकन मिळालं आहे.

 

हळदीचा वापर औषध निर्मितीसाठीही केला जात असल्यामुळे हळदीला देशासह जगभरातून मोठी मागणी आहे. देशभरात सध्या ५० लाख टन हळदीचा वापर केला जात असून त्यापैकी निम्म्या हळदीचं उत्पादन महाराष्ट्रात होत आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा