काँग्रेस पक्षाच्या महिला सदस्यांनी देशातल्या ७० कोटी महिलांचा आवाज व्हायला हवं, असं आवाहन अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अलका लांबा यांनी केलं आहे. अलका लांबा यांनी आज मुंबईत टिळक भवन इथं महिला प्रदेश काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत मार्गदर्शन केलं त्यावेळी त्या बोलत होत्या.
महाराष्ट्रात कल्याणमध्ये एका महिलेची सामुहिक बलात्कारानंतर हत्या केल्याच्या घटनेबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला, महिलांवरच्या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, अशा महिलांचा काँग्रेसच्या पदाधिकारी महिला नेत्यांनी आवाज व्हावं असं त्या म्हणाल्या.
लोकसभेत भाजपाचा विजयरथ महाराष्ट्रानं रोखला, हा डबल इंजिन सरकारला इशारा आहे, आता काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनीही संघटनेला बळकट करण्यासाठी झोकून काम करावं, आणि विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून द्यावा असं त्या म्हणाल्या.