हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी आज नवी दिल्लीत पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात दिलेल्या ७ आश्वासनांची पूर्तता हरयाणामधे काँग्रेसचं सरकार स्थापन झाल्यावर केली जाईल, असं खर्गे यांनी सांगितलं. अंमली पदार्थमुक्त हरयाणा, २५ लाख रुपयांचे मोफत उपचार, पिकांची तात्काळ नुकसान भरपाई, प्रत्येक कुटुंबाला तीनशे युनीट वीज आणि शेतकऱ्यांना किमान आधारभूत दराची कायदेशीर हमी, दोन लाख रोजगार, जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करणार, तसंच महिलांना दरमहा दोन हजार रुपये दिले जातील, स्वयपाकाचा गॅस प्रति सिलेंडर ५०० रुपये दरानं दिला जाईल. तसंच विधवा, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना दरमहा ६ हजार रुपये निवृत्तीवेतन दिलं जाईल, असं ते म्हणाले.
Site Admin | September 18, 2024 5:54 PM | Congress | Haryana Assembly elections