डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

November 27, 2024 8:04 PM

printer

काँग्रेसचा जेव्हा निवडणुकीत पराभव होतो, तेव्हाच ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं – काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे

काँग्रेसचा जेव्हा निवडणुकीत पराभव होतो, तेव्हाच ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं, अशी टीका भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना प्रत्युत्तर देताना केली. ते आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना संबोधित करत होते. जवळपास प्रत्येक राज्यात काँग्रेस पक्ष नाहीसा झाला आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपाने काँग्रेसपेक्षा जास्त जागा जिंकल्या. महाराष्ट्रातही भाजपाच्या नेतृत्वाखाली महायुतीने विजय मिळवला. त्यामुळे ईव्हीएममुळे अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी आणि गरिबांची मतं वाया जात असल्याचं खरगे यांचं वक्तव्य हा त्या समाजांचा अपमान आहे, असं पात्रा यावेळी म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा