सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. कराड इथं चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाालं, त्यावेळी चे बोलत होते. यावेळी काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
काँग्रेसचे विधानपरिषदेतले गटनेते सतेज पाटील यांनी या किल्ल्याला भेट देऊन दुर्घटनाग्रस्त जागेची पाहणी केली. छत्रपतींचा पुतळा कोसळणं ही दुर्दैवी बाब असून सरकारने यासाठी जनतेची माफी मागावी असं पाटील म्हणाले. दरम्यान, छत्रपतींचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने कोल्हापूर आणि नाशिकमध्ये आंदोलन केलं.