नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार जितेश अंतापुरकर यांनी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. गेल्या विधान परिषद निवडणुकीत त्यांचं मत फुटल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात होता, अशा आमदारांना यापुढं तिकीट दिलं जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसनं घेतली होती. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे.
Site Admin | August 30, 2024 6:35 PM | Nanded
काँग्रेस आमदार जितेश अंतापुरकर यांचा विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा
