डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

July 6, 2024 1:33 PM

printer

काँग्रेस नेते राहुल गांधी आज गुजरातच्या दौऱ्यावर

काँग्रेस नेते राहुल गांधी आज गुजरातच्या दौऱ्यावर जाणार असून ते अहमदाबादमधे पक्षकार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. याशिवाय ते राजकोट इथं क्रीडासंकुल आग दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांना भेटणार आहेत. तसंच पोलिस कोठडीत असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांनाही भेटतील.

 

लोकसभेत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरुन अहमदाबादमधे प्रदेश काँग्रेस कार्यालयासमोर भाजपा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमधे चकमक उडाली होती. त्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा