वायनाड लोकसभा मतदारसंघ सोडण्याचा राहुल गांधी यांचा निर्णय

लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातल्या रायबरेली आणि केरळमधल्या वायनाड मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघातल्या लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यायचा निर्णय घेतला आहे. ते आता रायबरेलीचं प्रतिनिधित्व करतील. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज ही घोषणा केली. 

 

राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या वायनाडच्या जागेवर काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी निवडणूक लढवतील, असं खरगे यांनी जाहीर केलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.