महायुतीच्या काळात महाराष्ट्रात येऊ घातलेले उद्योग गुजरातमध्ये नेण्यात आले, यामुळे राज्यातली दहा लाख कोटींची गुंतवणूक बाहेर गेली, आठ लाख नोकऱ्या गेल्या, आणि ६ हजारपेक्षा जास्त कंपन्या बंद पडल्या, असा आरोप काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी केला. त्या आज गडचिरोली इथं प्रचारसभेत बोलत होत्या. स्वातंत्र्यानंतर देशभरात मोठमोठे उद्योग, संस्था, निर्माण झाल्या. कोणत्याही सरकारने जनतेसोबत भेदभाव केला नाही. मात्र महायुती आणि भाजपाचं सरकार जनतेसोबत भेदभाव करतं, अशी टीका गांधी यांनी केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ‘एक है तो सेफ है’ अशी घोषणा देतात, मात्र महाराष्ट्रातले शेतकरी, मजूर, महिला, उद्योग कुणीही सुरक्षित नाही असा आरोप प्रियांका गांधी यांनी केला. महायुती सरकारच्या काळात बेरोजगारी आभाळाला भिडली आहे, असंही त्या म्हणाल्या.
Site Admin | November 17, 2024 3:42 PM | Gadchiroli | Priyanka Gandhi