काँग्रेसच्या राज्यभरातल्या जिल्हा समित्यांच्या अध्यक्षांची बैठक २४ फेब्रुवारी रोजी आणि प्रदेश काँग्रेस समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक २५ फेब्रुवारी रोजी बोलावण्यात आली आहे. या बैठकीत संघटनात्मक बाबींचा आढावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ घेणार आहेत. या बैठकीला काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतले पक्षाचे गट नेते सतेज पाटील, नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, प्रणिती शिंदे, कुणाल पाटील, मुझफ्फर हुसेन उपस्थित राहणार आहेत, असं काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी सांगितलं.
Site Admin | February 23, 2025 7:47 PM | Congress | Maharashtra
काँग्रेसच्या राज्यभरातल्या जिल्हा समित्यांच्या अध्यक्षांची उद्या बैठक
