डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं 31 उमेदवारांची यादी जाहीर

हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं 31 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा, गढ़ी सांपला किलोई मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. प्रदेश काँग्रेसचे प्रमुख उदय भान यांना होडलमधून उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसमध्ये काल दाखल झालेल्या कुस्तीपटू विनेश फोगटला जुलाना इथून तिकीट मिळालं आहे. राज्याच्या माजी मंत्री गीता भुक्कल या झज्जरमधून निवडणूक लढवणार आहेत. विद्यमान आमदार चिरंजीव राव यांना पुन्हा रेवाडीतून तिकीट देण्यात आलं आहे. हरियाणा विधानसभेच्या सर्व 90 जागांसाठी 5 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा